करोडो रुपये कमावून देणाऱ्या माडग्याळ मेंढ्या

विषय परिचय :-

करोडो रुपये कमावून देणाऱ्या माडग्याळ मेंढ्या

अलीकडील ४-५ वर्षात आपण बऱ्याच ठिकाणी माडग्याळ मेंढ्याना मिळणाऱ्या किमती बद्दल वाचल असेल. काही वेळेस तर एका माडग्याळ मेंढीची किंमत हि एक ते दिड कोटी रुपयांची बोली लागल्याचेही बातमी आपण वाचली असेल. तर आज आपण माडग्याळ मेंढी ची वैशिष्ट्ये, त्यांना माडग्याळ हे नाव कसे पडले आणि काय कारण असावे कि ह्या मेंढ्याना एवढी चांगली किंमत मिळत असेल ह्या बद्दल जाणून घेऊ.

पार्श्वभूमी:-

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये काही भागामध्ये शेती हि सिंचनाचे प्रश्न असल्यामुळे पावसावर आधारित आहे. अशा ठिकाणी बरेचसे शेतकरी हे शेतीला जोडव्यासास म्हणून पशुपालन सुद्धा करतात. त्यामध्ये गायी, म्हैस याबरोबरच शेळी किंवा मेंढी पालन देखील करतात . पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेंढीपालन व मांस उत्पादन याबाबत तशी जास्त माहिती आढळून येत नाही किंवा व्यावसायिक तत्वावर मांस उत्पादयासाठी मेंढीपालन करणारे फारच कमी शेतकरी आढळून येतात.

वास्तविक पाहता बऱ्याच देशामध्ये शेळीच्या मांसापेक्षा मेंढीच्या मांसाचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. मेंढीच्या मांसाला शेळी च्या मांसपेक्षा जास्त प्रमाणात जागतिक स्तरावर मागणी आहे आणि मेंढीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त पोषणमूल्ये असल्यामुळे त्याला दार हि चांगला मिळतो. सौदी अरेबिया, तुर्की, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका तशेच ऑस्ट्रेलिया या देशामंध्ये मेंढीच्या मांसाला मागणी असते. भारतामध्ये मेंढ्यांच्या विभागानुसार बऱ्याचस्या जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने माडग्याळ, दख्खनी ह्या जाती प्रसीद्ध आहेत. त्यातही माडग्याळ हि जात मांस उत्पादनासाठी उत्कृष्ट मनाली जाते.

माडग्याळ मेंढीची ओळख:-

तर आज आपण ह्या माडग्याळ मेंढीबद्दल जाणून घेणार आहोत. माडग्याळ हि मेंढीची जात (Madgyal Sheep) अवघ्या मेंढपाळ आणि हौशी लोकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. माडग्याल मेंढी ही एक मांसासाठी उत्कृष्ट प्रजात आहे जी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील दुष्काळी भागात आढळते. ते त्यांच्या जलद वाढीचा दर आणि कठीण परिस्थितीत भरभराट करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. मागील २-३ वर्षांमध्ये ह्या मेंढ्याना लाखो करोडोची बोली लागल्याच्या बातम्या पण आपण ऐकल्या वाचल्या असतील.

सांगली जिल्ह्यातील जात हा दुष्काळी तालुका. ह्या तालुक्यात पूर्वेकडील भागामध्ये माडग्याळ हे गाव आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे येथील शेती हि पावसावर आधारित आहे. अशा परिस्थितीत येथील लोकांनी शेतीला पशुपालन व प्रामुख्याने मेंढीपालनाची जोड दिलेली आढळते. ह्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात आणि इथली हि मेंढी मोठ्या प्रमाणात वेगळ्या वैशिष्टयामुळे प्रसिद्ध झाली आणि त्या गावाच्या नावावरूनच ह्या जातील माडग्याळ मेंढी असे नाव पडले व त्या नावानेच पूर्ण भारतात प्रसिद्ध पावली. तर ह्याच माडग्याळ मेंढीने त्या गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील सुद्धा अर्थकारण बदलण्याचं काम आणि पशुपालकांना चांगले पैसे मिळवूं देण्याचं काम केलं आहे. ह्या गावामध्ये दार शुक्रवारी भरणारा शेळ्या मेंढ्यांचा बाजार हा राज्यात प्रसिद्ध आहे. स्थनिकांबरोबरच परराज्यातील व्यापारीसुद्धा ह्या बाजाराला हजेरी लावतात.

माडग्याळ मेंढीची ओळख
krushigatha.in

माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये:-

तर मग माडग्याळ मेंढी कशी ओळखावी. माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) माडग्याळ मेंदीचा रंग पांढरा व त्यावर तपकिरी ठिपके असतात.

२) मेंढ्या उंच असतात.

३) त्यांचे नाक लांब व बाकदार असते. ( पोपटाच्या चोचीसारखे)

४) लांब पाय व निमुळती होत गेलेली लांब मान.

५) नर किंवा मादींना शिंगे नसतात.

६) ह्या मेंढ्यांच्या अंगावर लोकर कमी प्रमाणात असते.

माडग्याळ मेंढी प्रसिद्ध किंवा उपयुक्त असण्याची कारणे-

१) इतर मेंढ्यांच्या तुलनेत ह्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते.

२) नवजात पिलाचे वजन ३ ते ३.५ किलोपर्यन्त भरते व तीन महिन्यात त्या पिलाचे वजन २० ते २२ किलोपर्यंत जाते.

३) पूर्ण वाढ झालेली मेंढी ४० ते ५० किलोपर्यंत असते.

४) जास्त करून जुळ्या पिलांना जन्म देण्याची क्षमता.

५) माडग्याल मेंढ्या मांस उत्पादनासाठी आदर्श मानल्या जातात आणि त्यांचे मांस उत्कृष्ट दर्जासाठी ओळखले जाते.

६) १८ पाहण्यात दोन वेट मिळतात.

७) माडग्याल मेंढ्या इतर जातींपेक्षा उंच आणि मोठ्या असतात, त्यांची सरासरी उंची नरांसाठी 82-88 सेमी आणि मादीसाठी 63-75 सेमी असते.

८) माडग्याल मेंढ्यांचा वाढीचा दर इतर जातींच्या तुलनेत जास्त असतो आणि त्यांच्या मेंढ्यांचे वजन झपाट्याने वाढते.

९) माडग्याल मेंढ्या कठीण परिस्थितीत वाढू शकतात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील दुष्काळी भागात.

१०) माडग्याल मेंढ्या स्थानिक मेंढ्यांसह संकरित करून, संतती मेंढ्याच्या वैशिष्ट्यांपैकी सुमारे 75% गुण टिकवून ठेवते.

११) माडग्याल मेंढी ही एक दुर्मिळ जाती आहे आणि त्यांची किंमत चांगली आहे, काहींची 1.5 कोटी रुपयांपर्यंत विक्री होते.

सारांश-

माडग्याळ मेंढी हि तिच्या रोगप्रतिकारक क्षमता, चांगली वजनवाढ, जुळ्यांना जन्म देण्याची क्षमता व उत्कृष्ट दर्जाचे मांस ह्या मुले पशुपालकांना फायदेशीर व लोकप्रिय ठरत आहेत. त्याचबरोबर मागील ३-४ वर्षात ह्या मेंढ्याना लाखो रुपयांपर्यंत सुद्धा किंमत मिळाली आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढ्या ह्या पशुपालकांचे अर्थकारण बदलून टाकत आहेत.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत